विशाखा प्रणव चाकूरकर, बेंगलोर

 

मी विशाखा भास्कर देव श्री भास्कर वासुदेवराव देव यांची कन्या, आणि परम पूज्य वासुदेवराव देव यांची नात. माझा जन्म 7 फेब्रुवारी 1990 ला झाला. म्हणून दुर्दैवाने मला माझ्या आजोबांचा सहवास लाभला नाही. परंतु अगदी माझ्या लहानपणापासून मी त्यांच्या शिष्यांकडून त्यांच्याबद्दल खूप ऐकले आहे दर वर्षी मी माझ्या आई-वडिलांबरोबर एरंडोल, असोदा, कासोदा, अंमळनेर अशा अनेक गावांमध्ये त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा अनुभवला आहे. मी पहिल्या दुसऱ्या इयत्तेत असेल आणि त्यावेळी मला माझ्या आई वडिलांना सर्व शिष्य मंडळी मोठ्या श्रद्धेने मान देत. सर्व शिष्य मंडळींची तात्यां वरची गाढ श्रद्धा बघून खूप आश्चर्य वाटायचे. सन 2001 पासून माझे वडील श्री भास्कर वासुदेवराव देव यांनी आमच्या आप्तेष्टांच्या आणि शिष्य मंडळींच्या मदतीने तात्यांच्या पादुकांची स्थापना केली. त्या वर्षीपासून आमच्या राहत्या घरी जालन्याला गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. गुरुपौर्णिमेच्या उत्सवात एक वेगळाच आनंद मिळतो. उत्सवाला शेकडोंच्या संख्येने तात्यांची शिष्य मंडळी दर्शनास व प्रसाद घेण्यास येत. खरंच मला परमपूज्य तात्यांची नात असल्याचा अभिमान आहे आणि त्यांच्या शिष्य मंडळींना अनुभवायचे मला भाग्य लाभले.

विशाखा प्रणव चाकूरकर
बेंगलोर