सद्गुरु वासुदेव राव देव हे माझे आजोबा, मला माझ्या आजोबा चा जास्त सहवास लाभला नाही कारण मी शिक्षणासाठी हैदराबाद येथे राहत होतो. पण मी सुट्ट्यांमध्ये टेंभुर्णी ला यायचो त्यावेळेस आजोबा माझ्याशी खुप गप्पा मारायचे आणि माझ्याशी खेळायचे माझा लाड करायचे त्यांच्या आशीर्वादाने मी उच्च शिक्षण घेतले व माझे दोन्ही मुले पण आता उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या पादुका जालना येथील माझ्या भास्कर काकांच्या घरी आहेत आम्ही नेहमीच तेथे गुरु पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा करतो. माझ्या आजोबांच्या चरणी माझे कोटी कोटी नमन