सुधीर दुर्गादासराव देव, परभणी

 

माझे आजोबा वासुदेव महाराज

सद्गुरु वासुदेव देव महाराज हे माझे आजोबा. त्यांना कोटी कोटी नमन.

 आज आजोबा आमच्यात नसून बरेच वर्ष झालेले आहेत, तरीही ते आज आमच्या सोबतच आहेत असे आम्हाला आम्हाला वाटते. आजोबांच्या बाबतीतले अनुभव खूप आहेत, पण सगळे अनुभव सांगत नाही. एकच अनुभव सर्वांना सांगण्याची इच्छा आहे इसवी सन 1999 साली माझे लग्न झाले.

 लग्न लातूर येथे होते. निघायच्या आदल्या दिवशी मी स्वप्नातच आमच्या घरचे दार उघडले व दार उघडता क्षणी मला समोर साक्षात आजोबा दिसले व मला म्हणाले की

 "मी तुझ्या लग्नाला आलेलो आहे..." 

मी लगेच माझ्या वडिलांना उठवले, आणि त्यांना सांगितले की "बाबा लवकर उठा माझ्या लग्नासाठी आजोबा आलेले आहेत..."

 आणि बाबांनी खरोखरच उठून पाहिले तर घराचा दरवाजा उघडा होता.

 हा प्रसंग ज्या ज्या वेळेस मला आठवतो, त्या त्या वेळेस माझ्या अंगावर काटा येतो.... माझ्या आजोबांनी मला प्रत्येक संकटाच्या क्षणी संकटातून बाहेर काढले आहे. आणि आज सुद्धा ते नेहमी माझ्या अवतीभवती असतात. मला माहित आहे त्यांचा आशीर्वाद मला नेहमी साठीच लाभलेला आहे. आणि हा आशीर्वाद मलाच नाही,तर सर्वच नातवांना लाभलेला आहे. परत एकदा आजोबा च्या चरणी कोटी कोटी नमन.