माझे आजोबा तात्या यांना कोटि कोटि नमस्कार
सन 1999 मध्ये आम्ही स्वतःचे घर बांधायचे ठरवले, पण त्या वर्षी पाऊस झाल्यामुळे आमच्या प्लॉट मध्ये खूप पाणी साचले व काम सुरू करता येत नव्हते. त्यावेळेस तात्यांच्या आशीर्वादाने माझ्या मिस्टरांना एरंडोल ला जाण्याचे सुचले. आई, बाबा, सुधीर, भास्कर काका, काकू व आम्ही दोघं एरंडोल ला नानांकडे गेलो. जातांना आमच्या घराचा नकाशा नानांना दाखवायला सोबत घेऊन गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला खूप छान वाटले. त्यांनी आमचा नकाशा बघितला व आम्हाला सांगितले, 'घराचा नकाशा खूप छान आहे, दिशा वगैरे एकदम उत्तम आहे'.
"तुमचे घर लवकरच होईल" असा त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. मग आम्ही लातूरला आलो पंधरा एक दिवसांत घराचं बांधकाम सुरू केलं, आणि पाहता पाहता फक्त चार महिन्यात आमचं घर पूर्ण झाले. एरंडोल ला जाण्याचे सुचणे, यामागे पूर्ण तात्यांचे आशीर्वाद आहेत.
परत एकदा आजोबांना कोटि कोटि नमस्कार.